सरदार सिंह आणि देवेंद्र झाझरिया यांची ‘खेलरत्न’पुरस्कारासाठी शिफारस

0

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंह आणि पॅरालिम्पिक अॅथलीट देवेंद्र झाझरिया यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

हा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक आणि एक प्रमाणपत्रासह साडे सात लाख रुपयांची रक्कम दिली जाते.

सरदार सिंहने तब्बल 10 वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याने आठ वर्षे भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.

तर देवेंद्र झाझरियाने 2004 आणि 2016 सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीच्या दोन सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला देवेंद्र हा पहिलाच पॅरालिम्पिक अॅथलीट आहे.

LEAVE A REPLY

*