सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० होणार ?

0

मुंबई/राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री महिनाअखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास त्याचा कोणताही आर्थिक भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही.

राज्यात सुमारे पावणे दोन लाख कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वयोमान वाढवल्यास अनुभवी कर्मचार्‍यांमुळे प्रशासनाचे कामकाज अधिक वेगवान होईल, असे मानले जात आहे.

राज्य सरकारच्या प्रशासनात सुमारे 19 लाख कर्मचारी पदे निर्माण करण्यात आलेली आहेत.

दरवर्षी प्रशासनातून 3 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होतात. अधिकारी निवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेली पदे भरण्यास सरकार उत्सुक नाही.

सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे रिक्त जागांची भरती करण्याऐवजी बहुतांश विभागात माजी अधिकार्‍यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना अतिरिक्त सेवेसाठी सेवानिवृत्तीची रक्कम वजा करुन ते निवृत्त होण्याच्या दिवशी जितका पगार घेत होते तितके वेतन दिले जाते.

याशिवाय अनेक विभागांमध्ये हंगामी किंवा कंत्राटी पद्धतीने कामे करुन घेतली जातात.

मात्र सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास संबंधित कर्मचार्‍यांची 2 वर्षांची सेवा वाढण्यास मदत होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*