समृद्धी महामार्गासाठी होणार जमिनीची थेट खरेदी

0

कोपरगाव तालुक्यातील 10 गावांच्या शेतकर्‍यांना मिळणार 25 टक्के वाढीव मोबदला

अहमदनगर (प्रतिनिधी) – महत्त्वाकांक्षी अशा 4,600 कोटी रुपयांच्या नियोजित मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे साठी जमीन ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आला असून आता कोपरगाव तालुक्यातील 10 गावांमधील जमीन सरकार 25 टक्के वाढीव मोबदला देऊन थेट खरेदी करणार आहे. याबाबतच्या नोटिसा प्रांतांधिकारी कुंदन सोनवणे यांनी वृत्तपत्रांमध्ये जारी केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद या चौकोनातच स्थिरावलेल्या औद्योगिक प्रगतीचा वारू संबंध महाराष्ट्रात झेपावणारा हा ‘समृद्धीचा महामार्ग’ महाराष्ट्राला, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत तब्बल 20 वर्षांनी पुढे नेईल. तसेच 710 किमी लांबीच्या या सुपर एक्स्प्रेसमुळे मुंबई-नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ निम्म्यावर येईल. मालवाहतुकीसही त्याचा मोठा फायदा होईल. त्याहीपेक्षा या
महामार्गालगत विकसित करण्यात येणार्‍या 24 कृषी समृद्धी केंद्रामुळे कृषी औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. पण यात हजारो शेतकर्‍यांच्या जमिनी जात असल्याने त्यास नाशिकमधील सिन्नर आणि कोपरगावमध्ये याला विरोध होत आहे. यासाठी दोन्ही तालुक्यांत आंदोलनेही झाली होती. पण आता सरकारने खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत नोटीसाही जारी करण्यात आल्या आहेत संबंधित समिनीसाठी परीगणित होणार्‍या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर 25 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

कोणत्या गावांतील जमिनी जाणार
कोपरगाव तालुक्यातील 11 गावांतील जमिनी समृद्धी महामार्गात जाणार आहेत. त्यात संवत्सर (32.602 हे.), कोकमठाण (54.769 हे.),जेऊर कुंभारी (27.850 हे.), डाऊच खुर्द (15.940 हे.),चांदेकसारे (37.980 हे.), घारी (16.935 हे.), देर्डे-कोर्‍हाळे (34.528 हे.),धोत्रे (47.635 हे.), भोजडे (31.464 हे.), कान्हेगाव (24.636 हे.)

LEAVE A REPLY

*