VIDEO : सनई-चौघड्याच्या सुरात सभागृह नेत्याची वरात! उमेश कवडेंनी घेतला पदभार 

0

महापालिकेत सेनेचा जल्लोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय भवानी, जय शिवाजी.. आवाज कोणाचा… अशा घोषणाबाजी… सोबतीला सनईचा सुर अशा सुरेल अन् जल्लोषात उमेश कवडे यांनी सभागृह नेते पदाचा पदभार आज महापालिकेत स्वीकारला.
अनिल शिंदे यांनी सभागृह नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमेश कवडे यांना संधी देण्यात आली आहे. सेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, ह.भ.प.जंगले महाराज शास्त्री माजी सभागृह नेता अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरूडे, संजय शेंडगे, सचिन जाधव, संपत नलावडे, भाजपचे ज्येष्ठ नेते सदा देवगांकवर, सचिन पारखी, सुरेश तिवारी,मुदगल यांच्यासह सेनेचे पदाधिकारी तसेच कवडे समर्थक यांच्या उपस्थितीत कवडे यांनी सभागृह नेते पदाची सूत्रे स्वीकारले. तत्पर्वी कवडे हे राठोड यांच्या समवेत महापालिकेत पोहचले. त्यांच्यासोबत शिवसैनिक, नगरसेवक होते. महापालिकेच्या पायरीजवळच सनईच्या सुरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजी… आवाज कोणाचा… कवडे तूम आगे बडो… अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजी व सनईच्या सुराने महापालिकेतील वातावरण सेनामय झाले होते. सनईच्या सुरात सभागृह नेते पदाची वरात महापालिकेत निघाल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात नंतर चांगलीच रंगली.

 

LEAVE A REPLY

*