सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी आमिर खान अकोल्यात

0
 जि. अकोला (शिर्ला) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यात अभिनेता आमिर खान व त्यांची पत्नी किरण राव मंगळवारी सकाळी अकोल्यात दाखल झाले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव या पातूर तालुक्यांतील चारमोळी आणि शिर्लाकडे रवाना झाले.
चारमोळी तेथे विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. पाणी फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकर यांनी 8 मे रोजी भेट देऊन पाहणी केली.
गावात जलचळवळ उभारणारे सचिन कोकाटे आणि संतोषकुमार गवई व आपल्या साक्षगंधाचे सर्व पैसे दुष्काळमुक्तीसाठी देणार्‍या अनिसा पठाण यांच्याबरोबर आमिर खान दीड तास चर्चा करणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता सरपंच रिना सिरसाट यांच्या अध्यक्षतेत आमिर खान आणि किरण राव गावकर्‍यांशी थेट संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

*