सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : काकडदरा गावाची बाजी

0
अभिनेता अामिर खानच्या ‘पाणी फाउंडेशन’ने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा गावागावात झाली.
दुष्काळावर मात करणाऱ्यांच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘बॉलीवूड’चा सुपरस्टार शाहरुख खान, आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी, उद्योग जगतातील अजय पिरामल, अमित कल्याणी, आर. वेंकट, राजीव बजाज, जलसंपदामंत्री राम शिंदे, अभिनेते अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
९ हजार गावकऱ्यांनी सोहळ्याला गर्दी केली होती.
रिलायन्स फाउंडेशन, टाटा, भारतीय जैन विकास संघटना, एचडीएफसी यांनी आर्थिक सहकार्य केले.
आमिर खान व किरण राव ‘स्वाइन फ्लू’ने आजारी पडल्याने सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. व्हिडिअो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संपर्क साधला.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या काकडदरा या गावाने यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कपवर आपलं नाव कोरलं.  बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा चेक या गावाला देण्यात आला.  याबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दोन-दोन अशा एकूण 4 गावांना विभागून देण्यात आलं.

खटाव (जि.सातारा) तालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि.बीड) तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना 30 लाख रुपयांचे दुसरं बक्षीस विभागून देण्यात आलं. तर माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज (जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना 20 लाख रुपयांचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं.

LEAVE A REPLY

*