संपाला हजारेंचा पाठिंबा

0

अण्णांची मध्यस्थी करायला तयारी

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी संपाच्या दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी संपाला पाठिंबा दिला आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला खर्चावर आधारीत हमी भाव मिळत नाही. त्याने बँकेकडून घेतलेले किंवा खासगी कर्ज तो फेडू शकत नसल्यामुळे त्याला नैराश्य येते आणि तो आत्महत्या करतो, असेही हजारे म्हणाले. अनेक वर्षांपासून सातत्याने हे होत आल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकर्‍यांच्या बाजूने आपण सरकारसोबत चर्चा करण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले.

 
शेतकर्‍यांच्या संपाविषयी एका प्रसिद्धीपत्रातून अण्णा हजारे यांनी त्यांची भूमिका मांडली. सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळे शेतकर्‍यांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करुन शेतकर्‍यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी,असे अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.

 

 

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत. शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असल्यास, मी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला तयार आहे, असे देखील अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*