आ. जगताप यांचा पुतळा संतप्त शेतकर्‍यांनी जाळला

0
आंदोलकांचे जेलमध्येच उपोषण

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- कुकडीचे पेटलेले पाणी विझायला तयार नाही. दररोज यासंदर्भात नाट्यमय घडामोडी घडत आहे. आज दिनांक 15 रोजी शहरात कुकडीच्या पाण्याच्या आंदोलनसाठी आ. राहुल जगताप यांचा पुतळा काही शेतकर्‍यांनी जाळला तर काही शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालयाच्या गेटला कुलूप लावले. यासंदर्भात आंदोलकांना अटकही झाली. काहींनी जामीन घेतले. पण काहींची गावतळ्यात पाणी सोडण्यासाठी जेलमध्येच उपोषण सुरू केले आहे.

आज दिनांक 15 रोजी शहरात कुकडीच्या पाण्याच्या आंदोलनसाठी आ. राहुल जगताप यांचा पुतळा काही शेतकर्‍यांनी जाळला तर काही शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालयाच्या गेटला कुलूप लावले. या वेगवेगळ्या आंदोलनाचा एकाच गुन्हा दाखल करून 14 आंदोलकांना अटक करून नायालयासमोर हजर केले असता यातील सात आंदोलकांनी जामीन घेण्यास नकार दिला.
या 132 मायनर मधून जोपर्यंत कुकडीचे पाणी डाके तलाव, आनंदकर तलाव, पांढरकर मळा, माळीनगर, बोरूडेवाडी, यासह चोराचीवाडी गावतळे आदी ठिकाणी सोडले जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गोरख आळेकर, सुनील वाळके या आंदोलकांनी तहसिलदार व इतरांना पाठवलेल्या निवेदनात जोपर्यंत 132 वरून पाणी सोडून उदभव भरून दिले जात नाहीत तोपर्यंत आपण जेलमध्येच उपोषण करणार असे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*