संजय दत्तबरोबरच्या ‘त्या’ अफवांवर अखेर माधुरी दीक्षित बोलली!

0

एकेकाळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यातील रोमान्स बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता.

१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर जेव्हा संजय दत्तला टाडाअंतर्गत अटक करण्यात आली तेव्हा माधुरीने संजय दत्तपासून चार हात लांब राहणे पसंत केले.

वास्तविक जेव्हा संजय दत्तला अटक करण्यात आली होती, तेव्हा माधुरीने मीडियामध्ये स्पष्ट केले होते की, ती कधीच संजय दत्तबरोबर रोमॅण्टिकली इनव्हॉल नव्हती. त्यानंतर संजूबाबानेदेखील पुन्हा माधुरीशी जवळिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी, त्यांच्यातील रोमान्सच्या चर्चा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा रंगली होती की, संजूबाबाच्या बायोपिकमध्ये माधुरी एक भूमिका साकारणार आहे. एवढेच नव्हे तर जेव्हा माधुरीला ही बाब समजली होती की, राजकुमार हिरानी त्यांच्या ‘दत्त’ या बायोपिकमध्ये तिची भूमिका ठेवत आहे तेव्हा तिने संजूबाबाला फोनही केला होता.

तिने संजूबाबाला विनंती केली होती की, त्याच्या बायोपिकमध्ये तिच्याशी संबंधित कुठल्याही प्रकारचे डायलॉग किंवा सीन्स ठेवले जाऊ नये. या चित्रपटात संजूबाबाची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. जेव्हा माधुरीला या चर्चांविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने एका वृत्तपत्राला मुलाखत देताना स्पष्ट केले की, या निव्वळ अफवा आहेत. माधुरीने म्हटले की, ‘अशाप्रकारच्या चर्चांना आता माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही. मी राजकुमार हिरानी आणि संजय दत्तला कधीच फोन केला नाही.’

पुढे बोलताना माधुरीने हेही स्पष्ट केले की, ‘मला माहीत नाही की, अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवित आहे. मीच नव्हे तर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या चर्चांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, मुळात मला याबाबत काहीच देणेघेणे नाही.’ संजूबाबापासून दूर गेल्यानंतर माधुरीने कित्येक वर्षे कोणासोबतच नाते प्रस्थापित केले नव्हते. अखेर तिने चित्रपटाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेले डॉ. राम नेने यांच्याशी विवाह केला.

LEAVE A REPLY

*