संचालकांसह अमळनेरच्या शेतकर्‍यांची जिल्हा बँकेत धडक

0

जळगाव / किसान के्रडीट कार्डसह एटीएम कार्डच्या सक्तीविरोधात खुद्द जिल्हा बँकेच्या संचालकांसह अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज जिल्हा बँकेत धडक दिली.

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांच्याशी चर्चा करून त्यांना याविषयी निवेदन देण्यात आले.

जिल्हा बँकेतर्फे शेतकरी सभासदांना किसान के्रडीट कार्ड देण्याची कार्यवाही सुरू आहे. या मोहीमेला शेतकर्‍यांकडुन मोठा विरोध होत आहे.

आज जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील यांच्यासह विका संस्थांचे चेअरमन व शेतकर्‍यांनी थेट जिल्हा बँक गाठली.

या ठिकाणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांच्याशी शेतकर्‍यांनी चर्चा केली. यावेळी शेतकर्‍यांनी सरकारच्या धोरणाविरोधात तिव्र भावना व्यक्त केल्या.

कर्ज भरूनही शेतकरी चोर
जिल्हा बँकेचे पीककर्ज भरूनही शेतकरी चोर ठरत असल्याची भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीचे गाजर दाखवुन शेतकर्‍यांना झुलवित ठेवले. त्यामुळे जिल्हा बँकेची वसुली झाली नाही.

बँकेकडे कर्ज देण्यासाठी पैसा नसल्याने ज्या शेतकर्‍यांनी कर्ज भरले ते देखिल कर्जापासुन वंचीत राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशात जिल्हा बँकेने किसान क्रेडीट कार्ड आणि रूपे कार्ड देऊन शेतकर्‍यांची मोठी अडचण केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश एटीएम बंद राहत असल्याने शेतकर्‍यांना पैसा मिळत नाही.

काही शेतकर्‍यांना कार्ड वापरता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्ड रद्द करून पारंपारीक पध्दतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही निंभोरा येथील सुरेश पाटील यांनी केली.

कापसाला 42 हजार रूपये द्या
जिल्हा बँक कापसाला 36 हजार रूपये देते. अमळनेर तालुक्यात 75 टक्के शेतकरी कापुस उत्पादक आहेत.

त्यामुळे त्यांना हेक्टरी 42 हजार रूपये द्यावे अशी मागणी संचालक अनिल भाईदास पाटील व संचालिका तिलात्तमा पाटील यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*