संघर्ष यात्रेसाठी आघाडी सरकारला माणसे गोळा करण्याची वेळ : आ. कर्डिले

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या माध्यमातून खरा कर्जदार शेतकरी कोण आहे. हे पाहिले जाणार असून शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल आहे. कर्जमाफीमुळे सर्वाधिक फायदा धनदांडग्या पुढार्‍यांना होणार आहे.
स्व. मुंढे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेसाठी शेतकरी पेटून उठला होता. परंतु, आघाडी सरकारने जी संघर्ष यात्रा काढली, या यात्रेसाठी त्यांना माणसे गोळा करण्याची वेळ आली असल्याचा टोला आमदार शिवाजी कर्डिले यांनी आघाडी सरकारला लगावला.

 
भाजप सरकाच्यावतीने तीन वर्षात केलेल्या कामाचा आढावा यासंदर्भात शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवार फेरीचा शुभारंभ जेऊर येथून करण्यात आला. गणनिहाय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नगर बाजार समिती सभापती विलास शिंदे, तालुका प्रमुख दिलीप भालसिंग, पंचायत समिती सदस्य स्वाती कार्ले, सुनीता भिंगारदिवे, बाजीराव गवारे, बाळासाहेब पोटघन, मधुकर मगर, रमेश पिंपळे, रोहिदास मगर, दत्तात्रय मगर, राम पानमळकर, विकास कोथिंबीरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 
प्रा. बेरड, म्हणाले 25 ते 28 या चार दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या शिवारात जाऊन केंद्र राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन केले आहे.

 
62 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. परंतु, भाजप सत्तेच्या काळातच शेतकरी हिताचे निर्णय घेतले. जलयुक्त शिवारमुळे लोकचळवळ बाहेर आली. प्रत्येक थेंब अडविण्याचे काम भाजप सरकारने केले.

 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसमोर निरूत्तर
जेऊर येथील संवाद यात्रे दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य, शेतकरी यांच्यासाठी केलेले काम, त्यांच्या हिताचे निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची कामे यांची माहिती असणारे पत्रक उपस्थित शेतकर्‍यांना वाटले. शेतकर्‍यांनी हे पत्रक घेतले. मात्र, छोटेखानी सभा सुरू झाल्यानंतर एक शेतकरी उभा राहिला आणि त्याने भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजने व्यतिरिक्त काय काम केले. केवळ पाणी अडवा आणि पाणी जिरवा एवढेच शेतकर्‍यांच्या हिताचे आहे का? आज शेतकर्‍यांचा कांदा तीन रुपये किलोने विकला जात आहे. तुरीला भाव नाही. शेतकर्‍यांनी काय करावे, शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांचा फायदा अधिक होत आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांपुढे आ. कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड आणि अन्य पदाधिकारी निरूत्तर झाले.

 

तुरीचा दाणाही खरेदी करणार
शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यासाठी सरकारने तूर खरेदी केंद्र सुरू केले. त्यामुळे शेतकर्‍यांना तूर विक्री करता आली. तुरीला भाव ळिाला. शेतकर्‍यांकडे शिल्लक राहिलेला तुरीचा दाणाही खरेदी केला जाणार असल्याचे आ. शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*