संघटीत नसल्यामुळे आदिवासींकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष : ढवळे

0

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- आदिवासी समाज संघटीत नसल्यामुळे या समाजाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे असे प्रतिपादन एकलव्य समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी केले.

 

 

नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष पवनराजे सोनवणे, जिल्हा युवाध्यक्ष जयेश माळी, जिल्हा संघटक शिवाजी थोरात, युवा आघाडी तालुकाध्यक्ष कुमार माळी आदी उपस्थित होते.

 

 

श्री. ढवळे म्हणाले, आदिवासी समाजाकडे राज्यकर्ते केवळ मतांपुरते येतात. हा समाज हा विकासापासून वंचित राहण्यास तेच जबाबदार आसून समाजाने संघटीत होवून राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे.

 

 

जंगल, रानात राहणार्‍या या समाजाला आजही घरे नाहीत. मुले शिक्षणापासून लांब आहेत. समाज संघटीत झाल्याशिवाय प्रगती होणार नसल्याने आदिवासी समाजाला संघटीत करण्याचा प्रयत्न एकलव्य संघटना केल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी एकलव्य समाज संघटनेच्या शाखेचे ढवळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येवून माळीचिंचोरे येथे एकलव्य चौकाचे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*