सँनफ्रान्सिसकोमध्ये रंगणार ‘इंडियन अँकँडमी अँवाँर्ड’ सोहळा

मराठी सिनेमांचाही होणार गौरव
शाहरूख खान असणार ब्रँड अॅम्बेसेडर

भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे.

इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ठय म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड बरोबरच मराठी सिनेमातील कलाकार ,तंत्रज्ञांनाही गौरवण्यात येणार आहे.

बॉलिवूड ,मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे.

तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे, या पुरस्कार सोहळ्याचं प्रमुख अाकर्षण म्हणजे शाहरूख खान इंडियन अँकँडमी अँवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

ह्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत सौरभ पांडे आणि वंदना कृष्णा. त्यांच्यासोबत प्लॅनेट मराठीचे मुख्य अक्षय बर्दापूरकर , अभिनेता सुशांत शेलार आणि विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये हे सुध्दा सहप्रायाेजक आहेत..

LEAVE A REPLY

*