श्रीरामपूर, लाडगावात वीज पडली

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर व तालुक्यात जोरदार वादळ व विजांचा कडकडाट होवून काही ठिकाणी बुरबुर तर काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला. तालुक्यातील लाडगाव या ठिकाणी वीज पडून एक गायी दगावली आहे. मात्र या पावसामुळे काही ठिकाणी झाडे डली असली तरी नुकसानीचे प्रमाण खूपच अत्यल्प असे असल्याचे समजले. बाभळेश्‍वर येथे बिघाड झाल्याने श्रीरामपूरात अंधारात होते.

 
दरम्यान श्रीरामपूर-बेलापूर रोडवरील मोसंबी बागेजवळ विठ्ठल पुंजा पागिरे यांच्या घराजवळ असलेल्या झाडावर कोळसल्याने उभे झाड चिरले. या व्यतिरिक्त कोणतीही हानी झाली नाही.

 
काल सकाळपासून उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाहीलाही होत होती. मात्र दुपारी तीन वाजेनंतर वातावरणात एकदम बदल होवून ढग दाटून आले होते. अधून मधून जोरदार वादळ वारा सुटत होता. त्यामुळे पाऊस येणार असे वाटत होते मात्र काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आनक विजांचा गडगडाट होवून रिमझिम पाऊसास सुरुवात झाली. शहरातील संपूर्ण रस्ते ओलेचिंब झाले थोड्याशा प्रमाणात रस्त्यांवरुन पाणीही वाहू लागले.

ग्रामीण भागातील प्रवरा पट्टा व गोदावरी पट्ट्ायत चांगल्या प्रकारे पाऊस झाला. यजात गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, नाऊर, जाफराबाद, भामाठाण, घुमनदेव, टाकळीभान, खोकर भोकर, गळनिंब, मांडवे, कुरणपूर, फत्याबाद, उक्कलगाव, बेलापूर, पढेगाव, मातापूर, कारेगाव या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस झाला तर काही ठिकाणी केवळ वादळवारा होवून पावसाचे वातावरण तयार झाले होते. तसेच संगमनेर रोड परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

 
तालुक्यातील लाडगाव येथील भारत रंगनाथ खोरे यांच्या घरासमोरच असलेल्या गायीच्या गोठ्या बाहेर बांधलेल्या एका गायीच्या अंगावर वीज पडून ती गाय जागीच ठार झाली. ही गाय काही दिवसापूर्वी व्याली होती तिचे वासरुही जवळच होते मात्र वासरुला काहीही झाले नाही. लाडगाव, खिर्डी, मालुंजा, कान्हेगाव, भेर्डापूर या भागातही विजांचा कडकडाट व पावसाची रिमझिम झाली.

 

काही ठिकाणी चिखल झाला. या पावसामुळे उसाला फायदा होणार असून तर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. नुकसानीचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे अनेकांनी हा पाऊस चांगला झाला असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*