श्रीरामपूर, घारगाव, अकोले, जामखेडमध्ये पाऊस

0

श्रीरामपूर, संगमनेर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर व परिसर, संगमनेरातील घारगाव तर जामखेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उष्म्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. श्रीरामपूर शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या कमी अधिक सरी कोसळत होत्या. अकोले शहर व परिसरातही सरी बरसल्या.

 
संगमनेर प्रतिनिधीने कळविले की, जूनच्या सुरुवातीलाच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हे दिसत असतांना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. गेल्या आठवड्यातच बोटा, अकलापूर, कुरकुंडी परिसरात वादळी वार्‍यासह गारपाटीचा पाऊस झाला. या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले. त्यातच काल पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

 
आधून मधून वादळी वारे सुरुच असते त्याचबरोबर उन्हाचा तडाखाही कायम आहे. अशा परिस्थितीत पावसाचे चिन्हे दिसू लागतात. आणि अचानक पावसाला सुरुवात होते. घारगाव परिसरात काल सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. तशी शेतकर्‍यांची धांदल उडाली. आधीच गारपीटीने त्रासलेला शेतकरी आता उरलेल्या पिकासाठी धावतांना दिसत आहे. सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. दिवसभर उकाडा होता मात्र या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे.  जामखेडमध्येही पाऊस झाला.

 

 

LEAVE A REPLY

*