श्रीरामपुरात आणखी एक कट्टा पकडला

0

एकास अटक; आठवड्यातील दुसरी घटना

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांन कोम्बिंग ऑपरेशन राबविले असता यादरम्यान पोलिसांना कुविख्यात गुन्हेगार श्रावण सुरेश पिंपळे याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे तसेच त्यांचे पोलीस नाईक जोसेफ साळवी, पोलीस नाईक विजय वेठेकर, पोलीस नाईक रवींद्र खळेकर, पोलीस नाईक विजय ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मुंडले, प्रदीप साठे, शाहीद शेख, दीपक किल्लेदार, सचिन भणगे, चालक कचरू चोथवे यांच्या पथकाने काल मध्यरात्रीनंतर कोम्बिंग ऑपरेशन राबविले होते.

 

या ऑपरेशन दरम्यान या पथकाचे रांजणखोल परिसरात काही आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी कुविख्यात गुन्हेगार श्रावण सुरेश पिंपळे हा गावठी कट्ट्यासह असल्याची माहिती मिळाली. तेव्हा या पथकाने रांजणखोल गावात कोम्बिंग ऑपरेशन राबवून श्रावण सुरेश पिंपळे यास गावठी कट्ट्यासह जेरबंद केले. या गुन्हेगाराने अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तो पसार होता.

 
बेलापूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोटणे, कोकमठाण येथील स्कॉर्पिओ गाडीवरील दरोडा, चितळीजवळ दरोडा टाकून पळविलेली मारुती गाडी रेल्वे ट्रॅकवर टाकली होती. त्यावेळी एक रेल्वे चालली असता त्या रेल्वेला अडकून ही मारुती कार फरपटतं सुमारे 500 ते 600 मिटर अंतर गेली होती.
श्रावण पिंपळेने श्रीरामपूर शहर व तालुका, कोपरगाव, शिर्डी, धुळे, वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद याठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्यांच्या मागावर आहे.

 
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 72/2017 प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट 3/25, 236 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र खळेकर करत आहेत.

 

कट्टा प्रकरणातील आरोपी श्रावण सुरेश पिंपळे याच्याबरोबर तालुक्यातील आणखी एक कुविख्यात गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र तो पोलिसांच्या तावडीतून सहजपणे निसटला. तो कसा निसटला हे पोलिसांनाही कळाले नाही. तो होता की नाही याबाबत पोलीस सांगू शकले नाहीत. ते पिंपळे बरोबर कोणीच नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी तत्परता दाखविली असती तर नक्कीच तो कुविख्यात गुन्हेगार मिळून आला असता.

LEAVE A REPLY

*