श्रीरामपुरातील नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने ठराव केलेला असताना बरेचसे नागरिक उघड्यार शौचास बसत आहेत. त्यामुळे पालिकेने उघड्यावर शौचास बसणार्‍यांविरुध्द धडक मोहीम सुरु केली आहे. काल पालिकेच्यावतीने उघड्यावर शौचास बसणार्‍या 9 जणांना पकडले असून त्यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

 
श्रीरामपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून पालिकेचे वेगवेगळे पथक शहराच्या विविध भागात सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत फिरत असून उघड्यावर शौचास करणार्‍यांवर पाळत ठेवून आहेत. या पथकाने काल विविध भागातील 9 जणांना पकडले आहेत.

 
पालिका उघड्यावर शौचास बसू नये त्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहेत.गुड मॉर्निंग पथकाने धडक मोहीम सुरु केली आहे. शौचालये योजनेअंतर्गत शहरात शौचालये बांधकाम करण्यासाठी पालिकेमार्फत 12 हजार रुपयाचे अनुदान वाटप करण्याबाबत सहकार्य सुरु असून अनेक नागरिकांनी त्याचा लाभही घेतला आहे तरीही काही नागरीक उघड्यावर शौचास जातांना आढळून येत आहेत त्यांच्याविरुध्द ही गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे.

 

न्यायालयाकडून दंड !
बबन चांगदेव पाठे (वॉर्ड नं. 1, कॉलेजजवळ), साहेबराव शंकर शिरसिप (बोंबले वस्ती, वॉर्ड नं. 7), संजय बाबुराव दिवे (सिध्दार्थ नगर, वॉर्ड नं. 1), सुनील राऊत (सिध्दार्थ नगर, वॉर्ड न. 1), पप्पू गणपत गाढे (नेवासारोड, वेअर हाऊसजवळ, वॉर्ड नं.6), अरुण अगस्तीन गायकवाड (गायकवाड वस्ती, वॉर्ड नं. 7), पुंजाहरी एकनाथ तेलोरे (बोंबले वस्ती वॉर्ड नं. 7), आबासाहेब खंडागळे (नेवासा रोड, वॉर्ड नं. 6), अशोक दादाराव गायके (रा. गायकवाड वस्ती, वॉर्ड नं. 7) या 9 जणांना या पथकाने पकडून त्यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना काल न्यायालयात हजर केले असता त्यांना दंड ठोठावला

LEAVE A REPLY

*