श्रीगोंद्याचा तलाठी लाचेच्या जाळ्यात

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शेत जमिनीची महसुली रेकॉर्डला नोंद करून सुधारीत सातबारा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच घेणारा मुंढेकरवाडी येथील तलाठी जगन्नाथ हनुमंत म्हस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई नगर येथील लाचलुचपत पथकाने 30 मे रोजी सापळा रचुन केली.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील तक्रारदार याने खरेदी केलेल्या शेतजमिनीची महसुली रोकॉर्डला नोंद करून सुधारित सातबारा मिळावा म्हणून तलाठी यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. मात्र तलाठी जगन्नाथ हनुमंत म्हस्के (वय 57) यांनी महसुली रेकॉर्डला नोंद करून सुधारीत सातबारा देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
यावर तक्रारदार यांनी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे लोकसेवक जगन्नाथ म्हस्के हे लाच मागत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचप प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, स. फौ. काशिनाथ खराडे, पोहेकॉ. नितीन दराडे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, राजेंद्र सावंत, वसंत वाव्हळ, पोलीस नाईक तन्वीर शेख, अंबादास हुलगे यांच्या पथकाने सापळा कारवाई करून लोकसेवक तलाठी जगन्नाथ म्हस्के यांना तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच घेतांना पंचासमक्ष रंगेहात पकडून कारवाई केली.

LEAVE A REPLY

*