शेवटच्या 100 मी. शर्यतीत बोल्ट हरला

0
अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालणाऱ्या युसेन बाेल्टची अापल्या करिअरमधील शेवटच्या अॅथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटरमध्ये पुन्हा चॅम्पियन हाेण्याची संधी हुकली.
त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने ९.९५ सेकंदांत अंतर पूर्ण करून तिसरे स्थान गाठले. जस्टिन गॅटलिन ९.९२ सेकंदांसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
त्याने सलग तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाेल्टला मागे टाकून अव्वल स्थानावर धडक मारली. तसेच अमेरिकेच्या क्रिस्टियन काेलमनने ९.९४ सेकंदांसह १०० मीटरच्या रेसमध्ये राैप्यपदकाची कमाई केली.
कांस्यपदकाची कमाई करून बाेल्टने अॅथलेटिक्सच्या १०० मीटरमधील अापल्या विश्वाला अलविदा केले.
अाता ताे या स्पर्धेच्या २०० मीटरमध्ये १२ अाॅगस्ट राेजी शेवटचे धावणार अाहे.
अाकडेवारी : सर्वात उत्तम
– १०० मी. मध्ये ९.५८ सेकंदाचा विक्रम. त्याच्या जवळपासही कुणी नाही. ब्लॅक (९.६९) द्वितीय.
– ३० सर्वात वेगवान १०० मी.च्या टायमिंगमध्ये सर्वाधिक ९ वेळा बोल्टचेच नाव.

LEAVE A REPLY

*