शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी -राज्य पणन महासंघ संचालक ऍड. रवींद्र भैया पाटील

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  नोटाबंदीमुळे शेतकर्‍यांच्या माल खरेदीवर परिणाम झाला असल्याने कर्ज फेडण्याचे शेतकर्‍यांची परिस्थिती नसल्याने त्यांनी अद्याप आपले पीक कर्ज भरली नाही. ३१ मार्चपर्यंत कर्जमाफी न झाल्यास शेतकर्‍यांना ४ टक्के ऐवजी १२ टक्यांचे व्याज भरावे लागणार असल्याने आगामी ७-८ दिवसात राज्य सरकारने सरसकट कर्ज माङ्गी देऊन ७/१२ कोरा करुन राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यता असल्याचे मत पणन महामंडळाचे संचालक ऍड. रवींद्रभैया पाटील यांनी व्यक्त केले.

दि.१४ रोजी त्यांनी देशदूत भुसावळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी वार्तालाप करतांना ते बोलत होते.
तूरीची सरकट खरेदी करा

राज्य सरकारतर्फे संपूर्ण तालुक्यामध्ये नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची आवश्यकता आहे. बहुतांश केंद्रांवर सुविधा बारदान, सामान यासारख्या सुविधा नसल्याने अद्यापही केंद्र सुरळीत सुरु झालेली नाहीत. यामुळे केंद्रांची जी स्थिती आहे त्या स्थितीत व तूरीची प्रतवारी न करता केंद्रांनी सरसकट तूरीची खरेदी करुन शेतकर्‍यांना रक्कम तात्काळ केली पाहिजे अशी माफक अपेक्षा ऍड. पाटील यांनी व्यक्त केली.

जि.प. मधून कामे व्हावीत

ग्रामिण भागाची उर्जा जिल्हा परिषद आहे. जि.प.मध्ये विविध १६ खात्यांचे प्रश्न सुटतात. खर्‍या अर्थाने जि.प. स्थरावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामे झाल्यास कुणाला मंत्रालयात जाण्याची वेळच येणार नाही. तालुका स्तरावर मिटींगा घेऊन समस्या जाणून घेतल्यास प्रश्न जागच्या जागी सुटण्यास मदत होते म्हणूनच जि.प.ला मीनी मंत्रालय संबोधले जाते.

कर्जाचे पुर्नगठन व्हावे

बहुतांश शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठन झालेले नाहीत त्यांचे पुर्नगठन जिल्हा बँके मार्फत तात्काळ होणे आवश्यक आहे.

शेतकरी हवालदिल

बोदवड तालुक्यातील पाणी व पीक स्थिती चांगली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शेतकर्‍यांकडून पाणीपट्टी सक्तीने वसुल करु नये. तालुक्यातील  घरकुल, विहीरींच्या कामाची ऑर्डर्स आहेत मात्र एम.बी. रेकॉर्ड होत नसल्याने कामे प्रलंबित असल्याने अनुदानांचे पेमेंटही प्रलंबित असल्याची लाभाथ्यार्ंंची तक्रार आहे. याबाबत लवकरच तक्रारदारांच्या सह्यांचे निवेदन जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे  देऊन समस्या सोडविली जाणार आहे.

विज जोडणी करावी

तालुक्यातील थकित विज बिलापोटी पाणी पुरवठा योजना व विहीरींची विज जोडणी करुन पाणी पुरवठा पूर्ववत करावे. गुरांच्या पाण्याचा प्रश्‍न दरवर्षी होते. त्यासाठी राज्य सरकारने सामुुदायिक  व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

पाणीपुवठा योजनांचे पुनरुजीवन व्हावे

बोदवड तालुक्याची जिवनवाहिनी मानली जाणार्‍या ओडिए योजनेसाठी ८० कोटी रुपये मंजूर आहेत. योजनेचे काम प्रत्यक्षात सुरु होण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात सद्या दुष्काळी स्थिती असून पाणी समस्या बिकट आहे. मात्र मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात प्रतिभाताई पाटील यांची कुर्‍हा काकोडा येथील भूविकास बँकेची योजना, मुक्ताई जल उपसा सिंचन योजना, बोदवड सिंचन योजना, कोथडी येथील पाणी योजना  अशा विविध ५ पाणी योजना मंजूर आहेत.

त्यांचे पुनरुज्जीवन झाल्यास बोदवड तालुक्यतील पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  योजना मंजुर झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी प्राधान्यक्रम देऊन योजना तळीस नेण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास योजना बारगळते व तीचा खर्च वाढतच जातो.

समस्यांवर केली मात

१९९२ साली आपण जि.प. अध्यक्ष असतांना दुष्काळी परिस्थिती होती. तेव्हा तालुक्याचा दौर केला या दौर्‍यात तालुकास्तरावर टंचाई अधिकार्‍यांची नियुक्ती करुन तालुकास्थरावर बैठका घेऊन ग्रमस्तांच्या तक्रारी ऐकून त्या जागच्या जागी सोडविण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच पाणी योजना तयार केल्याने अनेक समस्या सुटल्या.

दरम्यान पाणी आडवा पाणी जिरवा, अंतर्गत ठिकठिकाणी माती, सिमेंट व नाला बांध घालून पाणी अडविले. आरोग्य, कृषी पदार्थ उपक्रमांसाठी प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

*