शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा पुढाकार

0

प्रतिनिधी देणार एक महिन्याचे मानधन

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक एक महिन्याचे मानधन शेतकरी कर्जमुक्तीसाठी देणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली. तसेच संघटनेच्यावतीने 1 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

गाडे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना सदैव प्रयत्नशील आहे. कर्जमुक्तीसाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेना शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उतरली होती. या आंदोलनामुळेच केंद्र सरकारला सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

 

 

सराकारकडून कर्जमाफीचे निकष ठरविले जात असतानाच व विरोधकांचे श्रेयाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेने कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचे मानधन शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी देणार असे जाहीर केले आहे.

 

 

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी एक महिन्याचे मानधन देणार आहेत. यामध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच महापालिकेचे नगरसेवक तसेच नगरपंचायतचे नगरसेवक हे सर्वजण आपल्या एक महिन्याचे मानधन देणार आहे. तसेच संघटनेच्यावतीने एक लाख रुपये सुध्दा देण्यात येणार आहेत.

 

 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आम्ही नेहमीच लढलो आहे. यापुढेही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही लढणार आहे. शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांना कर्जातून मुक्ता मिळावी, यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. आम्ही आमचे एक महिन्याचे मानधन देणार आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.

LEAVE A REPLY

*