शेतकरी संपाबाबत आज पुणतांब्यात विशेष बैठक

0

पुणतांबा (वार्ताहर)- शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जाणार आहे. या संपाची रणनिती ठरविण्यासाठी पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांची विशेष बैठक आज शनिवार दिनांक 13 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता चांगदेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

 
बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविणे, शेतकर्‍यांच्या अंतिम मागण्यावर चर्चा करणे, समिती स्थापन करणे, या महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. एक महिन्यापूर्वी शेतकरी संपावरही संकल्पना पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांनी पुढे आणली.

 

या उपक्रमास राज्यातील शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पुणतांबा येथे येऊन शेतकरी संपावर या आंदोलनाची पार्शभूमी समजावून घेतली व आंदोलनास पाठिंबा दिला होता. त्यामूळे शेतकरी संपाबाबद पुणतांबेकर काय निर्णय आजच्या बैठकीत घेतात याकडे जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*