शिवसेनेच्या मुखपत्राची भाजपाकडून होळी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबद्दल अपमानकारक लिखाण केल्याच्या निषेधार्थ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राची लक्ष्मी कारंजा चौकात होळी करण्यात आली.
यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक किशोर डागवाले, महेश तवले, मालन ढोणे, मनीषा काळे, श्रीकांत साठे, किशोर बोरा, गौतम दीक्षित, चेतन जग्गी आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले की, खासदार रावसाहेब दानवे हे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अत्यंत खंबीरपणे सांभाळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास शिवसेनेने व विरोधी पक्षाने केला आहे. बोलीभाषेतील शब्द त्यांनी कालच्या भाषणात वापरले होते. त्यात शेतकर्‍यांचा अपमान होईल, असे काही वक्तव्य नव्हते. प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणामध्ये लघुशंका करू का? इतके खालच्या पातळीवरील वक्तव्य करून शेतकर्‍यांचा सर्वांत मोठा अपमान केला होता. अशी बेताल वक्तव्ये भाजपाचे पदाधिकारी कधीही करीत नाहीत. शिवसेना राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असताना सहकार्य करण्याऐवजी कामात खोडा घालत आहे. दानवे यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केल्याने आम्ही सर्वजण दुखावलो आहोत, असे ते म्हणाले.

भरत ठुबे, संजय ढोणे, जालिंदर शिंदे, वल्लभ कुसकर, मल्हार गंधे, बाळासाहेब सातपुते, वाहीद कुरेशी, मल्हारी दराडे, अंकुश भापकर, अफसर खान, धोंडिराम हरेल, नवनाथ कोतकर, विश्‍वनाथ पोंदे, सुभाष साळवे, रोशन गांधी, अज्जू शेख, विपूल पुप्पाल, नितीन जोशी, राजेंद्र काळे, अन्वर खान, अनिकेत मांढरे, कैलास गर्जे, अ‍ॅड. राहुल रासकर, सूरज पुंड, रोहन डागवाले, अनिल शिंदे, अ‍ॅड. सूर्यवंशी, बंटी डापसे आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*