शिर्डी : साईबाबा संस्थानाला 32 कोटींच्या दोन इमारती दान

0

शिर्डी : शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत.

या दोन्ही इमारती विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने अभारल्या आहेत.

या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत 32 कोटी 27 लाख 13 हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे 1 कोटी 63 लाख रुपये इतकं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरले.
संस्थानाच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी ठरणार आहे़.

डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानाचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरु करणार आहे.

पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण 9782.44 चौरस मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या.

 

LEAVE A REPLY

*