शिक्षक, व्यापार्‍याचे मोबाईल लंपास

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– पेंट व्यावसायिक आणि शिक्षक अशा दोघांचे सॅमसंग कंपनीचे मोबाईल चोरट्याने लंपास केले.

भिंगार व कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जालिंदर रामभाऊ पालवे असे शिक्षकाचे तर ब्रिजमोहन शामसुंदर मालू असे पेंट व्यावसायिकाचे नाव आहे.

या दोघांनीच पोलिसांकडे तक्रार दिली.

पालवे हे बारदरी येथे शिक्षक असून निर्मलनगरमधील भगवान बाबा चौकात राहण्यास आहे.

शाळेवरून घरी येताना ते भिंगारच्या शुक्रवार बाजारात खरेदीसाठी गेले असता त्यांचा सॅमसंग जे 7 मोबाईल चोरीस गेला.

दुसरी घटना नगर शहरातील गंजबाजारात दुसरी मोबाईल चोरीची घटना घडली.

मालू यांचे गंजबाजारात पेंटचे दुकान आहे. गुरूवारी रात्री दुकानातून सॅमसंग गॅलक्सी ए 5 मोबाईल बिहारी व त्याच्या साथीदाराने लंपास केला.

LEAVE A REPLY

*