शिंदे,भागिरथी हॉस्पिटलवर कारवाई

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज कारवाईच्या तिसर्‍या दिवशी बुरुडगांव परिसरातील शिंदे, भागिरथी हॉस्पिटलवर हातोडा उगारला. दरम्यान पार्किंग खुली करण्याची सुरू असलेली महापालिकेची कारवाई थांबवावी, डॉक्टरांना त्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी करत डॉक्टर जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात पोहचले.

नगर शहरात 52 हॉस्पिटलच्या इमारती या नियमबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यनंतर महापालिकेने कारवाईचा दंडुका हाती घेतला आहे. जेसीबीचा घाव टाकून नियमबाह्य बांधकाम पाडण्याचे सत्र शनिवारपासून महापालिकेने सुरू केले आहे. पहिल्या व दुसर्‍या दिवशी तारकपूर परिसरातील हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. तिसर्‍या दिवशी बुरूडगाव रस्त्यावरील हॉस्पिटलवर कारवाई सुरू होती.
दरम्यान डॉक्टर संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेतली. रुग्णसेवेत अडथळा निर्माण होत असल्याने कारवाई थांबविण्यात यावी, डॉक्टरांना मुदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी आमदार अनिल राठोड हेही त्यावेळी डॉक्टरांसोबत होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्याची सुचविले. नगररचनाकार संतोष धोंगडे यांनी कोर्टाचे आदेश वाचवून दाखविले.

सर्व डॉक्टर एकवटले असून त्यांनी काल उशिरा जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारी धाव घेत पुढील कारवाईला स्थगिती मिळावी अशी मागणी केली आहे. शहरातील हॉस्पिटलच्या पार्कींगवर करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येवून सदर अहवाल 10 ऑगस्ट रोजीपर्यत सादार करण्यंाचे आदेश दिला आहे. त्या पार्श्‍वभूमिवर पहिल्या टप्यात 52 हॉस्पिटलच्या अनाधिकृत बांधकावर कारवाई करण्याची कार्यवाही मनपा प्रशासनाने सुरु केली आहे. शनिवारी जाधव, सिटीकेअर व वानखेडे हॉस्पिटलच्या पार्कींगमधील शेड, पक्के बांधकाम काढण्यात आले.त्यानंतर सोमवारी सकाळपासून तारकपूर भागातील सानप, बागल, होडशीळ, चेडे हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. दुपारनंतर शिरसाठ, कराळे, लाईफ लाईन हॉस्पिटलवर कारवाई करण्यंात आली होती.

LEAVE A REPLY

*