शाहिद कपूरची मुलगी मीशा टीव्ही डेब्यू करणार?

0

शाहिद कपूरची मुलगी मीशा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण बऱ्याच ठिकाणी शाहिद पत्नी मीरा अन् आपल्या मुलीसोबत स्पॉट झाल्याने तिचे फोटोज सोशल मीडियावर ट्रेण्ड करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड डान्स डेनिमित्त शाहिद कपूरने मुलगी मीशाबरोबरचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.

बातम्यांनुसार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिला चित्रपटांच्या आॅफर्स येत आहेत, परंतु त्यास तिने नकार दिला आहे. मात्र यावेळेस मीराने अभिनयासाठी होकार दिला असून, लवकरच ती प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. मात्र तुम्ही जर चित्रपटात मीराला बघू इच्छित असाल तर तुमची ही इच्छा कदाचित पूर्ण होणार नाही. कारण मीरा टीव्हीवर अर्थात छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. एवढेच नव्हे तर मीराबरोबरच तिची चिमुकली मीशाही डेब्यू करणार आहे.

शिवाय सध्या मीरा राजपूत तिच्या बॉलिवूड डेब्यूवरूनही खूप बिझी आहे. मीराच्या मते, तिचा बॉलिवूड डेब्यू खूप स्पेशल करायचा आहे. त्यामुळेच ती सध्या प्रोजेक्ट्स फायनल करण्यात व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

*