शाळांमध्ये जंक फूड विक्रीस बंदी

0

शीतपेये, चॉकलेट हद्दपार, रोटी, कढीभात, इडली, सांबरवडा, टोमॅटो, अंडी मिळणार

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – शाळांच्या उपहारगृहांमध्ये जंकफूड ठेवण्यास आणि त्याची विक्री करण्यास शालेय शिक्षण विभागाने बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक कक्ष अधिकारी प्रमोद पाटील यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे.

 
विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषण मुल्ये सुधारणा आणि चांगल्या पध्दतीने शारिरीक व मानसिक विकास होण्यासाठी हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेचे संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट गठीत करण्यात आला होता. या गटाने जंक फूडमध्ये साखर, मीठ व मेदाचा समावेश जास्त प्रमाणात असतो. व ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते व ज्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह व हृदयरोग वाढीस लागण्यास मदत होते, असे या कार्यगटाने सूचित करून या पदार्थांवर प्रतिबंध घालावा असे स्पष्ट केले होते. यातून आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर होतो, असा निष्कर्षही या कार्यगटाने नोंदविला आहे.

 
या पार्श्‍वभूमीवर शाळेतील उपहारगृहात बट्याट्याचे चिप्स, सरबत, बर्फाचा गोळा, शर्करायुक्त कार्बोनेटेड शीतपेय आणि नॉन कार्बोनेटेड शीतपेय, गोड रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कालाकंद, नुडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, गोल गप्पे, सर्व चघळण्याच्या गोळ्या व कँडी, जिलेबी, बुंदी, चौकलेटंस, केक, बिस्कीटे, जाम जेली या पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. हे प्रतिबंधित पदार्थ शाळांच्या उपहारगृहात आढळणार नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे.

 
गहू रोटी, पराठा की ज्यात ऋतूनिहाय भाज्या वापरलेल्या असाव्यात. भात, भाजी पलाव आणि डाळ, भाजी पुलाव, भात आणि काळा चना, गोड दालिया सोबत नमकिन दलिया भाजी, भात आणि पांढरा चना, भात आणि राजमा, कढीभात, बलगर, गहू उपमा, पपई, टोमॅटो, अंडी, चिंतेचा भात, हिरवे चने, भात, सांबर, इडली, वडा, सांबर, खीर, दही, ताक, लस्सी, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सॅण्डवीच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी जलजीरा असे पदार्थ शाळेतील उपग्रहात ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 
दरम्यान शासनाने असा निर्णय घेतला असलातरी उपहारगृहचालक याची किती अंमलबजावणी करतात आणि विद्यार्थीही किती प्रतिसाद देतात यावर यश अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

*