शारापोव्हाला वाईल्ड कार्ड नाही, फ्रेन्च टेनिस फेडरेशनचा निर्णय

0

रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाला फ्रेन्च ओपनमध्ये थेट वाईल्ड कार्डने प्रवेश देण्यास आयोजकांनी नकार दिला आहे.

फ्रेन्च टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष बर्नार्ड गिडीचेली यांनी शारापोव्हाची वाईल्ड कार्डची विनंती मान्य करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

शारापोव्हाने 2012 आणि 2014 साली फ्रेन्च ओपनचं विजेतेपद पटकावले होते. पण वाईल्ड कार्ड हे दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना दिले जाते, डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेल्या खेळाडूंना नाही, असंही गिडीचेली यांनी स्पष्ट केले.

मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचं सेवन केल्याप्रकरणी 15 महिने बंदीचा कालावधी संपताच शारापोव्हानं गेल्या महिन्यात स्टुटगार्ट ओपनमधून पुनरागमन केलं होतं. पण ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी तिला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

फ्रेन्च ओपनसाठी वाईल्ड कार्ड नाकारलं गेल्यावर काही तासांतच मारिया शारापोव्हावर रोममधील टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेण्याची वेळ ओढवली.

LEAVE A REPLY

*