शहरातून भाळवणीत चालवलेली दारू जप्त

0

अडीच लाखासह दोघांना अटक

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील बागडपट्टी येथील तेलरेजा दुकानातून नगर तालुक्यातील भाळवणी येथे चालविलेली दारू कोतवाली पोलिसांनी जप्त केली आहे. यात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्ष दत्तात्रय जर्हाड व पोपट ममताजी पाचंगे या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

 
नगर शहरातील सावेडी परिसरात तेलरेजा हा दुकानावर रविवारी (दि.7) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली होती. त्यात तेलरेजा दुकानाचे मालक चुन्नीलालशेठ तेलरेजा याच्यावर गुन्हा दाखल केला होता. असे असून देखील आज पुन्हा या दुकानातून मालाचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. सोमवारी (दि.8) आरोपी जर्हाड व पाजंगे ही दोघे एम. एच 16 एबी 1480 या कारमधून नगर तालुक्यातील हॉटेल संकल्प येथे दारु घेऊन जाणार असल्याची माहीती पोलिसांना समजली होती.

 
सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या करची झडती घेतली असता त्यात 50 हजार रूपयांची दारु मिळून आली.

 
चौकशी केल्यानंतर दारूची अवैध वाहतूक केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांना बेड्या ठोकून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

  शहरातील हॉटेल वैष्णवी, तेलरेजा, जाधव मटका हे तोफखान्याच्या हाद्दीत नावाजलेली ठिकाणी आहेत. पोलिसांचे त्यांच्याशी अर्थपुर्ण व्यवहार असेल तरी या अवैध धंद्यावर कारवाई केली तर त्यांना तत्काळ जामीन होतो. त्यामुळे हा आरोपी सोकावले आहेत. त्यांना अटक केल्यानंतर किमान दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यास चौकशी करण्यास सोेपे जाऊ शकते. त्यामुळे दारु, मटका, बुकी अशा आरोपींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*