व्हॉट्सअॅपचे ‘कलरफुल टेक्स्ट स्टेटस’ फीचर!

0

व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवं फीचर टेस्टिंग करत आहे.

फेसबुकनं मागील वर्षीच कलरफुल टेक्स्टचं फीचर आपल्या स्टेटस टॅबसाठी आणलं होतं. आता हेच फीचर व्हॉट्सअॅप आपल्या स्टेटस बारमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.

अँड्रॉईड पोलिसांच्या रिपोर्टनुसार, कलरफुल टेक्स्ट अॅपच्या बीटा व्हर्जन 2.17.291 मध्ये आहे.

या फीचरसाठी स्टेटस टॅबमध्ये कॅमेरा आयकॉनच्यावर एक फ्लोटिंग पेन्सिल असणार आहे. या फ्लोटिंग पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर कलर टेक्स्ट अपलोड करता येईल.

इथं व्हॉट्सअॅप तीन ऑप्शन देईल. तुम्ही इमोजी अॅड करु शकता, फॉन्ट सिलेक्ट करु शकता किंवा बॅकग्राऊंड कलरही बदलू शकता. ज्यामुले तुमचं टेक्स्ट कलरफुल होईल.

 

LEAVE A REPLY

*