व्हिनस विल्यम्सचा सलग दोन सेट्समध्ये पराभव करत मुगुरुझाने मिळवले विम्बल्डनचे विजेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सचा 7-5, 6-0 अशा सलग दोन सेट्समध्ये पराभव करत मुगुरुझाने पहिल्यांदाच विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

गार्बिनचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

गार्बिननं गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तिला एकाही ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये धडक मारता आली नव्हती. पण यंदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारुन तिनं विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं.

सात वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या व्हिनस विल्यम्सवर मात करुन मुगुरुझाने मिळवलेला विजय अभूतपूर्व ठरला आहे.

 

LEAVE A REPLY

*