व्हायरसच्या धोक्यामुळे अनेक एटीएम बंद!

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या जगभरातील संगणक ‘वॉन्नाक्राय’ या रॅनसमवेअरच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या व्हायरसचा धोका भारतातील एटीएम यंत्रणेलासुद्धा होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश एटीएम काल सोमवारी काही काळासाठी तर काही दिवसभर बंद होते.
‘वॉन्नाक्राय’ हा रॅनसमवेअरमुळे दीडशेपेक्षा जास्त देशांतील 2 लाखांहून अधिक संगणक यंत्रणांवर परिणाम झाला आहे. या रॅनसमवेअरकडून विंडोज एक्सपी या ऑपरेटिंग सिस्टीमला लक्ष्य करण्यात येते आणि भारतातील 70 टक्के एटीएममध्ये हीच यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे 10 वर्षांतील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यामुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
हा धोका ओळखून रिझर्व्ह बँकेने सर्व संबंधित बँकांना एटीएम यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामासाठी बर्‍याच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परंतु, मोठ्या संकटापासून वाचण्यासाठी सहकार्याचे आवाहन बँकांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*