व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली

0

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते.

व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नायडूंना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत.

भारताचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून ते आज शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती भवनात आज सकाळी दहा वाजता व्यंकय्या नायडू शपथ घेतील.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारमधील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशातून उपराष्ट्रपती बनणारे तिसरे व्यक्ती आहेत. नायडूंच्या आधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्ही गिरी यांनी देखील देशाचं उपराष्ट्रपतीपद भूषवलं आहे.

LEAVE A REPLY

*