वेस्ट इंडिज वि. पाकिस्तान; पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ ने जिंकली

0

पाकिस्तानने तिसऱ्या व अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात सहा चेंडू शिल्लक असताना विंडीजविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.

वेस्ट इंडिजमध्ये पाकिस्तानने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि निवृत्ती जाहीर करणारे दिग्गज फलंदाज मिसबाह-उल-हक व युनिस खान यांना शानदार निरोप दिला.

वेस्ट इंडिजतर्फे रोस्टन चेसने नाबाद १०१ धावांची खेळी केली, पण संघाला ३०३ धावांचे लक्ष्य गाठून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ९३ धावांत सहा फलंदाज गमावले होते. त्यांचा डाव २०२ धावांत संपुष्टात आला.

त्याआधी, पाकिस्तानच्या ३७६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २४७ धावांची मजल मारली होती. पाकिस्तानने मालिकेत २-१ ने विजय मिळवला.

पहिल्या डावात ६९ धावांची खेळी करणारा चेस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

LEAVE A REPLY

*