वृध्देश्वरच्या डोंगरावर आग

0

करंजी (वार्ताहर) – पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथील सोन्याचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या जंगलाला शुक्रवारी आग लागली. मात्र वृध्देश्वर देवस्थान व वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवण्यात आली.

 
श्रीक्षेत्र वृद्धेश्‍वर येथून मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणार्‍या रस्त्यालगतच्या डोंगराला आग लागली. या आगीमध्ये वाळलेले गवत व काही झाडे जळाली. डोंगराला आग लागल्याची माहिती कळताच वृद्धेश्‍वर देवस्थानचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी यांनी धाव घेऊन आग विझवली. यामुळे डोंगरात असलेल्या औषधी वनस्पती, वन्यप्राणी यांचे नुकसान टळले. जेथे आग लागली होती तेथे जवळच वनविभागाने लावलेल्या हजारो औषधी वनस्पती होत्या. या वनस्पतींमुळेच या डोंगराला सोन्याचा डोंगर म्हणून ओळखले जाते.

 
डोंगराला लागलेल्या आगीमध्ये काही प्रमाणात लहान-लहान झाडे व वाळलेले गवत जळून गेले. ही आग वाढली असती तर मोठी हानी झाली असती. मात्र आग लागल्याची माहिती कळताच वृद्धेश्‍वर देवस्थानचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी यांनी धाव घेऊन पाणी, माती यांच्या मदतीने आग विझवली.

LEAVE A REPLY

*