विनोद खन्ना यांच्या लोकसभेतील रिक्त जागेसाठी ‘या’ अभिनेत्यांची नावे चर्चेत!

0

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या खासदारपदाची जागा भरुन काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून विनोद खन्ना यांनी खासदारपद भूषवले होते .

अभिनयासोबतच राजकारणाच्या पटलावरही त्यांचा वावर उल्लेखनीय होता.

पण, त्यांच्या जाण्यानंतर संसदेत गुरदासपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यक्तीची शोधाशोध सुरु झाली आहे.

मुख्य म्हणजे विनोदजींच्या जागेसाठी चित्रपटसृष्टीतून अभिनेता अक्षय कुमार आणि ऋषी कपूर यांची नावे समोर येत आहेत.

दरम्यान, अक्षयव्यतिरिक्त या जागेसाठी रविना टंडन, सोनू निगम, सनी देओल यांची नावंही समोर येत होती. पण, भाजपशी संलग्न सूत्रांच्या म्हणण्यानुसार चाहत्यांच्या गर्दीपेक्षा मतदारांची मतं मिळवणारा एखादा चेहराच गुरदासपूर मतदार संघासाठी योग्य आहे.

LEAVE A REPLY

*