विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत – Photo Gallery

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – आकाशाला कवेत घेण्याची स्वप्ने घेवून कुतूहल, उत्सुकता, काहीशी भिती अशा विविधांगी भावना मनात घेवून चिमुकल्या विद्यार्थ्यांची पावले आज दिर्घसुट्टीनंतर शाळेकडे वळली.
उन्हाळी सुट्यांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळांची आज ‘घंटा वाजली’. शाळा प्रशानांकडूनही ढोल ताशांचा गजरात चिमुकल्याचे औक्षण करून विद्यार्थ्यांना पेढा भरवून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध उपक्रमाद्वारे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, शाळेचाच पहिला दिवस असलेल्या चिमुरड्यानी केलेल्या ‘किलबिलाटा’मुळे दररोज शेकडो मुलांना सांभाळणार्‍या शिक्षकांसह पालकांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्या आज संपल्या. कधी काळी शाळा सुरु होवून आठ दिवसांवर उलटल्यानंतरही शाळेत न दिसणारी गर्दी आज पहिल्या दिवसांपासून शाळांमध्ये दिसून आली.

शाळा प्रशासनांकडूनही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशाचा पहिला दिवस असल्याने शाळा परिसरात सजावट करण्यात येवून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

तसेच वर्गाच्या बाहेर रांगोळीच्या पायघडया टाकण्यात आल्या होत्या. शहरातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आलेली होती.

रांगोळ्यांच्या पायघड्या, लेझिम पथम, ढोल ताशांचा गजराने शाळांना उत्सवाचे स्वरुप आले होते. यावेळी ढोल ताशाच्या गजरात गुलाबपुष्प, चॉकलेट, गोड खाऊचे वाटप करून तसेच औक्षण करुन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे देखील वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणित झाला होता.

LEAVE A REPLY

*