विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

0

चहार्डी / शहरातील पटवे गल्लीतील रहिवाशी रज्जाक शेख रशीद वय ३६ याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

आज दि ५ शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पटवे गल्ली तील रज्जाक शेख रशीद हा व्यवसायाने वायरमन होता त्याच्या राहत्या घरात कुलर सुरू होता.

त्यात करंट उतरले कुलरला हात लावताच त्यास जोरदार विजेचा शॉक लागल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला.

त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.पाथरवट यांनी त्यास मृत घोषित केले.

याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

*