वादळाचा कांदा, आंब्याला तडाखा

0

भोकर, खोकर परिसराला नुकसान,  वीज कोसळून तीन गायी दगावल्या

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर, खोकर व घुमनदेव परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये कांदा व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसात वीज पडल्याची घटना घडली असून त्यामध्ये तीन गायी ठार झाल्याची घटना घडली आहे. दगावल्या असल्याची घटना घडली. गायींचा व कांदा व आंब्याच्या बागांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह अवकाळी पावासाला सुरुवात झाली. पाऊस येईल, असे चिन्हे दिसू लागल्याने ज्या शेतकर्‍यांची कांद्याची काढणी झाली. त्यांची कांदा झाकण्यासाठी लगबग सुरु होती. तर काहींचा कांदा तसाच शेतात पडून होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजला असून मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले. फळाची मोठी नासाडी झालेली आहे.
यामध्ये खोकर शिवारातील गट नं. 123 मध्ये अशोक कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव यांचे बंधू भागीनाथ बाबुराव जाधव यांच्या साडेपाच एकरावर असलेल्या केशर आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भोकर गावाजवळ असलेल्या गट नं. 3/1 मध्ये वस्ती असलेले भिकचंद आसाराम चव्हाण यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाखाली पाच गायी व दोन शेळ्या बांधलेल्या होत्या.
त्यातील दोन गाभण गाईंवर वीज पडली. त्या जागीच ठार झाल्या. यामध्ये सुदैवाने बाकीच्या तीन गायी व दोन शेळ्या यातून बचावल्या आहेत. यामुळे चव्हाण कुटूंबीयांचे सुमारे एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले. तसेच पश्‍चिमेला भोक- वडाळामहादेव रोडलगत गट नं. 286 मध्ये वस्ती असलेले तुकाराम लक्ष्मण पवार यांच्या शेतातील घराजवळील बाभळीच्या झाडाला बांधलेली एक गाय वीज पडून दगावली. त्यामुळे पवार कुटूंबियांचे सुमारे 40 हजाराचे नुकसान झाल्याचे कामगार तलाठी यांनी सांगितले.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे व गायींचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार सुभाष दळवी यांनी संबंधीत विभागाचे मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना आदेश दिले. दरम्यान पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, महेश पटारे, दत्तात्रय पटारे, सुदाम पटारे आदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

 अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे व गायींचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार सुभाष दळवी यांनी संबंधीत विभागाचे मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना आदेश दिले. दरम्यान पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, महेश पटारे, दत्तात्रय पटारे, सुदाम पटारे आदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

*