वर्षभरात कौन्सिल हॉलचे नूतनीकरण; महापौरांकडून पहाणी

0

दहा लाख रुपयांची तरतूद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या महापालिकेतील कौन्सिल हॉलचे वर्षभरात नुतणीकरण केले जाईल. त्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. महापौर कदम यांनी मंगळवारी कौन्सिल हॉलची पहाणी केल्यानंतर नुतणीकरणाची माहिती दिली.

स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दिलीप सातपुते, मुदस्सर शेख, उपशहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के, सेवानिवृत्त शहर अभियंता एन.डी.कुलकर्णी, इलेक्ट्रीक विभागाचे आर.जी.सातपुते, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, आर्किटेक मनोज जाधव, किशोर कानडे, सागर थोरात यावेळी उपस्थित होते.
कौन्सिल हॉलचे नुतणीकरणाची मागणी गत चार वर्षापासून विविध संघटना करत आहे. नुतणीकरणाचे काम माझ्याच कार्यकाळात पूर्ण केले जाईल असे आश्‍वास महापौर कदम यांनी दिले. नागरिकांसाठी सांस्कृतिक प्रदर्शन भरविणे, धार्मिक, शैक्षणिक कामासाठी सभागृह खुले करून दिले जाईल. सभागृह नुतणीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे. लवकरच नुतणीकरणाच्या कामाला सुरूवात होईल असे कदम यांनी सांगितले.
कौन्सिल हॉल ही नगर शहराचे वैभव आहे. याच हॉलमधून नगरकरांचे महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत. हॉलमधील थोर पुरूषांची तैलचित्रे जुना ठेवा असून तेथे तैलचित्र लावले जातील. हॉलच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार असल्याने काम लवकर हाती घेतले जाईल असे बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटने आग लागल्याने कौन्सिल हॉल पूर्णपणे उध्दवस्त झाला. पुणे येथील संस्थेकडून या हॉलचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यांच्या अभिप्रायानुसार ही वास्तू पुन्हा उभारण्यात, नुतणीकरण करता येऊ शकते असा अहवाल देण्यात आला आहे. त्यासाठी कोणतेही नवीन बांधकाम करण्याची गरज नाही. हॉलचे पत्रे बदलणे, भिंतींना प्लॅस्टर करणे, फ्लोरिंग स्टाईल बसविणे, पूर्वीसारखीच गॅलरी करणे, तैलचित्रे लावणे, जिन्याला रिलींग बसविणे ही कामे केली जाणार असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*