वडीलांच्या निधनानंतरही मुलीची दहावीच्या परीक्षेला हजेरी

0

उंटावद, ता.यावल, |  वार्ताहर :  डांभुर्णी येथील अरूण सोपान भिरूड यांचे दि.६ रोजी रात्री १ वाजता अल्पशः आजाराने निधन झाले ते ५० वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांची मुलगी निकीता ही येथील डॉ.दिवाकर खंडु चौधरी विद्यालयात इयत्ता १० वीत असुन दि.७ रोजी तीचा बोर्डाचा पहीला पेपर होता.

घरी रात्री १ वाजता वडीलांचे निधन झाल्यामुळे संपुर्ण परीवारावर शोककळा पसरली. मात्र १० वी चा पेपर असल्यामुळे पेपर देणे ही महत्वाचे होते, म्हणुन निकीता परीक्षेसाठी नेहरू विद्यालय किनगाव येथे गेली व पेपर संपल्यावर तीने वडीलांचे अंत्यदर्शन घेतले व  नंतर अरूण सोपान भिरूड यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरूण भिरूड यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परीवार आहे. मुलगा मोहीत इयत्ता ८ वीत विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव येथे शिक्षण घेत असुन दोघे ही भाऊ-बहीन अत्यंत अभ्यासु व हुशार आहेत.

यावल तालुक्यातील पहीलीच घटना असुन डांभुर्णीसह किनगाव येथील नेहरू विद्यालय परीसरात (निकीताच्या परीक्षा केंन्द्राजवळ) उपस्थीतानमध्येही पेपर संपेपर्यंत चर्चा होती  डांभुर्णी डी.के.सी. विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांसह नेहरू विद्यालय किनगाव येथील शिक्षकांनीही निकिताचे सांत्वन करत तीला परीक्षेसाठी हिंम्मत दिली.

निकीताला डॉ.डी.के.सी.विद्यालयातील शिक्षक रविंन्द्र निळे यांनी आपल्या मोटारसायकलने किनगाव येथील परीक्षाकेंन्द्रापर्यंत नेले. तिला हिंम्मत देत रविंन्द्र निळे यांनी परीक्षा केंन्द्रावर पोहचवले.

LEAVE A REPLY

*