लोणावळा हत्याकांड : चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याची आरोपीची कबुली

0

तब्बल अडीच महिन्यांनी  लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.

या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.

चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते.

यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अखेर या तपासाला यश आलं आहे.

तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती.

LEAVE A REPLY

*