लाभार्थी न निवडल्याने जिल्हा परिषदेचे दहा कोटी अखर्चित

0

स्थायी समितीची बैठक :शिक्षकांच्या
गैरसोईच्या बदल्या टाळण्याची मागणी 

अहमदनगर (प्रतिनिधी) – ङ्गेबु्रवारी महिन्यांत राज्य सरकारने व्यक्तिगत लाभाच्या योजनेत लाभार्थ्याला साहित्याऐवजी रोख स्वरूपात निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेला विविध योजनामधील व्यक्तिगत लाभाच्या योजनेतील लाभार्थी निवडता आले नाही.

यामुळे जिल्हा परिषदेचे सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली.
अध्यक्षा शालीनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्थायी समितीची पहिली बैठक झाली. यात जिल्हा परिषदेचा गतवर्षात झालेला खर्च आणि अखर्चित निधीवर चर्चा झाली. यात समाज कल्याण विभागाचा 2 कोटी 67 लाख रुपये आणि महिला बालकल्याण विभागाचा पावणे दोन कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला समोर आले.

केवळ व्यक्तिगत लाभाच्या योजनेत लाभार्थी न निवडता आल्याने हा निधी अखर्चित राहिला आहे. बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाने प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली शिक्षकांची गैरसोईच्या बदल्या करण्यात येवू नयेत, अशी मागणी सदस्य संदेश कार्ले यांनी केली.जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात वेगळी चळवळ उभी राहत असून त्यात शिक्षकांच्या गैरसोईच्या बदल्या झाल्यास त्याचा ङ्गटका या चळवळीला बसण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

गेल्यावर्षी शिक्षकांच्या समानिकरण्याच्या नावाखाली झालेल्या बदल्यामध्ये शिक्षकांची गैरसोई झाली असल्याचा कार्ले यांनी यावेळी ठेवला. कमीत कमी प्रशासकीय आणि जास्त जास्त विनंती बदल्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर हा निर्णय शासनाचा असून शासनाला स्थायी समितीच्या भावना कळवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातून महावितरण कंपनीचे पोल आणि वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. या तातडीने हलवण्याची मागणी योवळी करण्यात आली.
बैठकीला उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सभापती कै लास वाकचौरे, अजय ङ्गटांगरे, अनुराधाताई नागवडे, उमेश परहर, सदस्य भगवान पाचपुते, प्रताप शेळके, अनिल कराळे, संदेश कार्ले, महेश सुर्यवंशी, सुप्रियाताई झावरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

8 तारखेपासून कर्मचार्‍यांच्या बदल्या
जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व 4 या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या 8 तारखेपासून सुरू होणार आहेत. यात 8 तारखेला सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण, ग्रामीण पाणी पुरवठा आणि लघू पाटबंधारे विभाग. 9 तारेखला महिला बालकल्याण विभाग.10 तारखेला आरोग्य आणि ग्रामपंचात विभाग. 12 तारखेला कृषी व पशुसंवर्धन विभाग. 15 तारखेला प्राथमिक शिक्षण विभाग आणि समान्य प्रशासन विभाग आणि 16 तारखेला परिचर यांच्या बदल्या होणार आहेत.लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना 600 गुण ठेवण्यात आले होते.

  कर्मचार्‍यांच्या बदल्यामध्ये काही कर्मचार्‍यांना सवलत मिळावी, यासाठी विनंती, प्रशासकीय बदल्यामध्ये 5 बदल्या करण्याचे अधिकारी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर शासनाने द्यावेत, असा ठराव यावेळी करण्यात आला. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी ठरवण्यात आलेल्या अवघड क्षेत्राचे पुर्नतपासणी करण्याची यावेळी करण्यात आली. पाणी पुरवठा योजनांची पाणी पट्टी दरमहा एकूण वार्षिक मागणीच्या किमान आठ टक्के वसूली ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि टीपीओ यांनी केली पाहिजे, अशी मागणी कार्ले यांनी केली. 

LEAVE A REPLY

*