लातूरमध्ये काँग्रेसची पिछेहाट, भाजपाला बहुमत; चंद्रपूरमध्ये भाजपा

0

नाशिक, ता. २१ :  लातूर महापालिकेच्या निवडणूक निकालांनी काँग्रेसला धक्का बसला आहे.

स्व. विलासराव देशमुखांच्या काळात काँग्रेसचा गड असलेल्या लातुरने महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपाला कौल दिला आहे.

एकूण ७० जागा असलेल्या लातूर महापालिका निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला ४१ जागा मिळून बहुमत मिळाले आहे.  तर काँग्रेस २८, तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.

विशेष म्हणजे मागील महापालिका निवडणूकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नव्हता, तर काँग्रेसला ४९ जागा मिळाल्या होत्या.

चंद्रपूर महापालिकेत ६६ पैकी भाजपाला ३७ (मागच्या निवडणूकीत १६ जागा) जागा मिळाल्या असून येथेही त्यांना स्पष्ट बहुमत आहे.

काँग्रेसला १३ जागा मिळाल्या असून मागच्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा निम्यावर आल्या आहेत. मागच्या निवडणूकीत त्यांना २६ जागा मिळाल्या होत्या.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा, मनसेला १, शिवसेनेला २, बसपाला ७ जागा याठिकाणी मिळाल्या आहेत.

मागील निवडणूकीत बहुजन समाजवादी पक्षाची केवळ १ जागा होती. यंदा त्यात ६ जागांची वाढ झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय.

परभणीच्या ६५ जागांपैकी ४८चा निकाल हाती आला असून काँग्रेस ३३ ( मागच्या वेळेस २३ जागा), राष्ट्रवादी १७ (मागच्या वेळेस ३० ) , तर भाजपा ८ (मागच्या वेळेस २ जागा), शिवसेना ६ (मागच्या वेळेस ८ जागा)  अपक्षांना १ जागा मिळाल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

*