लाच स्विकारतांना कक्ष अधिकारी गजाआड

0

धुळे / येथील प्रभारी मुख्याध्यापिकांच्या अपिल निकाली काढण्यासाठी 10 हजाराची लाच घेतांना राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक येथील सहाय्यक कक्ष अधिकारी रवींद्र शामराव सोनार यांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत माहिती अशी की, धुळे येथील एका शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकांनी त्यांच्या शाळेच्या संदर्भात राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक कार्यालय येथे केंद्रीय माहितीचा अधिकार सन 2005 चे अनुषंगाने द्वितीय अपिल केले होते.

तक्रारदार यांना 25 हजाराचा दंड न करता त्यांच्या बाजूने निकाल देवून सदर अपिल निकाली काढण्यासाठी 15 हजाराची लाच सहाय्यक कक्ष अधिकारी रवींद्र शामराव सोनार यांनी मागीतली.

याबाबत मुख्याध्यापिकांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून दि. 6 मे रोजी नाशिक येथील राज्य माहिती आयोग खंडपीठ कार्यालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिन्यानजिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला तेथे रवींद्र सोनार यांना दहा हजाराची लाच घेतांना पकडले.

 

LEAVE A REPLY

*