लवकरच येणार रामदेव बाबा यांचा रियालिटी शो!

0
टीव्हीवर तुम्ही आतापर्यंत असे अनेक टीव्ही शो पाहिले असतील, ज्यात डान्स, सिंगिग, कॉमेडी, डेटिंग, स्टंट आणि बिग बॉसच्या घरातील गोंधळ पाहिला आहे. पण आता बाबा रामदेव एक असा रियालिटी शो आणत आहेत, जो अगदी वेगळा असेल असे म्हटले जात आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबा रामदेव हा शो जज करताना दिसू शकतात. शोमध्ये ते महागुरूच्या भूमिकेत असतील. तर बॉलिवूड अॅक्ट्रेसही या शोमध्ये जजच्या भूमिकेत असेल. तिच्याशिवाय शोमध्ये सिंगर शेखर रविजानी आणि कनिका कपूररही असेल.
या रियालिटी शोची कन्सेप्ट अगदी युनिक असल्याचे सांगितले जात आहे. शोमध्ये रामदेव बाबा महागुरू असतील आणि ते मधून मधून ज्ञानवर्धक बाबी सांगतील, असे सांगितले जात आहे.
या शोमध्ये कंटेस्टंट भजन गाताना दिसतील, ते ऐकून भक्ती रसात प्रेक्षक न्हाऊन निघतील.
हा शो ‘लाइफ ओके’ वर टेलिकास्ट होणार आहे. पण हा शो केव्हा टेलिकास्ट होणार हे अद्याप समोर आलेले नाही.

LEAVE A REPLY

*