लवकरच चलनात येणार 200 रुपयाची नोट

0

नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयाची नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारने २०० रुपयाची नोट छापण्याची तयारी सुरु केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयाच्या नोटच्या छपाईला सुरुवातदेखील केली असून आगामी काही महिन्यांमध्ये या नोटा चलनात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला.

आरबीआयने या वृत्तावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थतज्ज्ञांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. 200 रुपयाच्या नोटेमुळे दैनंदिन व्यवहार आणखी सुलभ होतील असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

*