ललित मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले धोनीचे ऑफर लेटर!

0

ललित मोदी यांनी काल (सोमवार) इंस्टाग्रामवर एमएस धोनी याचे ऑफर लेटर पोस्ट केले. इंडिया सीमेंटकडून धोनीला हे ऑफर लेटर मिळाले होते. मोदींनी पोस्ट केलेले ऑफर लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ऑफर लेटरमध्ये धोनीच्या मासिक उत्पन्नाचा तपशील दिला आहे.

लेटरनुसार, धोनीचे मूळ वेतन 43,000 रुपये आहे. बीसीसीआयच्या ‘अ’ श्रेणीतील क्रिकेटपटू असलेला धोनीला इंडिया सीमेंटने तुटपुंजे पॅकेज ऑफर केल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीचे सध्याचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. श्रीनिवासन यांच्या कंपनी काम करण्यास कसा काय तयार झाला? असा सवाल ललित मोदी यांनी उपस्थित केला आहे.

लेटरनुसार, 2012 मध्ये इंडिया सीमेंटने धोनीची व्हाइस प्रेसिडेंटपदी (मार्केटिंग) नियुक्ती केली होती.

त्याचे मूळ वेतन 43 हजार रुपये होते. सोबतच 21 हजार 970 रुपये महागाई भत्ता (डीए), 20 हजार रुपये स्पेशल पे आणि 60 हजार रुपये स्पेशल अलाउंस मिळत होता.

याशिवाय धोनीला न्यूज पेपर-मॅग्झिनसाठी 175 रुपये आणि एंटरटेनमेंटसाठी प्रति महिना 4500 रुपये मिळत होते.

LEAVE A REPLY

*