लखनऊ : मीराबाई गेस्ट हाऊसबाहेर IAS अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

0

आज सकाळी 6.40 वाजता लखनौमधील हजरतगंज परिसरातील मीराबाई गेस्ट हाऊसबाहेर एक आयएएस अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. या मृत आयएएस अधिकाऱ्याचं नाव अनुराग तिवारी असून ते कर्नाटक कॅडरचे आहेत.

अनुराग तिवारी उत्तर प्रदेशातील बहराईचचे रहिवासी होते. बंगळुरुच्या खाद्य आणि पुरवठा विभागाचे आयुक्त होते.

त्यांचे फोन कॉल्सही तपासले जात आहेत. अनुराग तिवारी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनुराग तिवारी 2007 बॅचचे आयएएस होत. पोलिसांच्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसपासून केवळ 50 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला.

LEAVE A REPLY

*